रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बंद
By Admin | Updated: September 22, 2014 00:22 IST2014-09-22T00:22:12+5:302014-09-22T00:22:12+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळणी.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बंद
सिंदखेडराजा (बुलडाणा): तालुक्यातील साखरखेर्डा बस स्थानकावर २0 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी चार बसेसचे टायर बसल्याने त्या उभ्या होत्या. रस्त्याच्या दुरावस्थेमूळे कित्येक बसेस नादुरूस्त झाल्या आहेत.
साखरखेर्डा ते देऊळगाव माळी, गोरेगाव-काटेपांग्री-वडगावमाळी-चायगाव, शेंदुर्जन- सायाळा-मेहकर, साखरखेर्डा-शेंदुर्जन हा रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावरुन अनेक वाहने ये तात आणि जातात. नविन चालकाला या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक बसेसचे टायर बसणे, तांत्रीक बिघाड होणे असले प्रकार वाढत आहेत. मेहकर आगारात तांत्रीक कामगारांची संख्या एक आकडीच असून २७ तांत्रीक कामगार कमी आहेत. ८८ बस पैकी अनेक बसेस नेहमीच नादुरुस्त असतात. त्यांची दुरुस्ती होत नाही. २0 सप्टेंबरला सकाळी मेहकर आगाराच्या एम.एच.२0 - ७८0३, एम.एच.४0- ८४४३, एम.एच.४0 - ८१२४, एम.एच.४0 - ५१५१ या चार बसेस टायर बसल्याने आणि तांत्रिक बिघाडीने एकाच ठिकाणी उभ्या होत्या.