दारूबंदीसाठी दुर्गेचे रुप धारण करा
By Admin | Updated: August 24, 2014 00:59 IST2014-08-24T00:59:25+5:302014-08-24T00:59:25+5:30
वृषाली बोंद्रे यांचे आवाहन : हिरकणी जनजागृती यात्रेस प्रतिसाद

दारूबंदीसाठी दुर्गेचे रुप धारण करा
चिखली : ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाय योजना करण्यासाठी विचार विनीयम करणे त्यांच्या कौटुंबिक जीवनात कलह पसरविणार्या दारू सारख्या समस्यावर लढा उभारण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करणे या हेतूने हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी जनजागृती यात्रा प्रारंभ केली आहे. या यात्रे अंतर्गत २१ ऑगस्ट रोजी माळशेंबा, साकेगांव, भोगावती, भोकर, पळसखेड दौलत व गोद्री या गावात या कार्यक्रम संपन्न झाले. कोणीतरी आपूलकीने विचारपूस करते आहे हे पाहून ग्रामीण महिलाही उत्साहाने या यात्रेत व कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी झाल्या. ग्रामीण भागात शासनातर्फे राबविण्यात येणार्या घरकूल योजना, रेशन कार्डच्या समस्या, दारिदय रेषेखालील लोकांच्या सर्व्हेक्षणा बाबतीत विविध समस्येवर या जनजागृती यात्रे दरम्यान उहापोह करण्यात आला. ग्रामीण भागातील सर्वात तीव्र स्वरूपाची समस्या म्हणजे दारूचे व्यसन. यासंदर्भात ग्रामीण भागातील महिला जास्त आक्रमक दिसून येत आहेत. या जनजागृती यात्रेत उपस्थित होणारे हे मुद्ये व ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण लढा उभारेल असे आश्वासन वृषालीताई बोंद्रे यांनी यात्रेत आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येवून हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण राबवित असलेल्या शाखा स्थापना व सदस्य नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केली. ही जनजागृती यात्रा साकेगांव, माळशेंबा, भोगावती, भोकर, पळसखेड दौलत व गोद्री या गावात पोहचली तेव्हा ग्रामीण महिलांनी या यात्रेचे स्वागत केले. उपरोक्त गावात संपन्न झालेल्या कार्यक्रमात साकेगांव येथील प्रकाश निकाळजे, आंबादास पाटील, छत्रपती लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, सरपंच विलास पाटील, उपसरपंच विमलबाई निकाळजे, रेखाबाई लोखंडे, माळशेंबा येथील दिलीप कार्ले, मधुकर म्हस्के, व इतर भोगावती येथील गजानन डुकरे, सुगंदाबाई समाधान डुकरे, प्रतिभा विलास डुकरे, शशिकला सुरेश डुकरे, राजकोर डुकरे, सविता राजेश डुकरे, शेषराव देवराव डुकरे, लिबांजी पुंजाजी डुकरे, गणेश भानदास डुकरे, प.ल.शेळके, भोकर येथील भागवत नेवरे, पळसखेड दौलत येथील संरपंच श्रीमती लाताताई गायकवाड, प.स.सदस्या विमलबाई लहाने, ग्रा.प.सदस्या शिलाबाई ज्ञानेश्वर गायकवाड, सरला सुभाष गायाकवाड, विजया गजानन गायकवाड, महिला सदस्या, गावातील संपुर्ण महिला बचत गटाच्या सदस्या, राजे छत्रपती मित्र मंडळाचे सदस्य, तसेच गावातील महिलांची व नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. तर गोद्री येथील तुकाराम उंबरकर, कैलास सुरडकर, रंगनाथ परीहार, संजय परिहार, शफिकभाई, यांच्यासह नागरीक आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.