तूर उत्पादकांच्या हातावर तुरी!
By Admin | Updated: March 22, 2017 13:27 IST2017-03-22T13:27:02+5:302017-03-22T13:27:02+5:30
हमी दराने तूर विक्री केलेल्या शेतकºयांना चुकाºयासाठी महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

तूर उत्पादकांच्या हातावर तुरी!
बिलासाठी महिनाभर प्रतीक्षा
खामगाव: हमी दराने तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकाऱ्यासाठी महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. खामगाव येथील केंद्रावर विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने तूर खरेदी करण्यात येत आहे. या केंद्रावर तूर विकलेल्या शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागत असून, २२ मार्च रोजी १ मार्च पर्यंत तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरच्या शेतकऱ्यांना रक्कमेची प्रतीक्षा आहे.