शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

राज्यातील शाळांची निश्चितीसाठी सगुण विकास कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:41 IST

शाळांची निश्चितीसाठी शिक्षण विभागाच्यावतीने सगुण विकास कार्यक्रम(ट्युनिंग आॅफ स्कूल) राबविण्यात येणार आहे.

- नितीन गव्हाळे

अकोला: राज्यातील प्रत्येक केंद्रामधून किमान दोन शाळांमध्ये ट्युनिंग जुळविण्यासाठी अर्थात शाळा सिद्धीमध्ये ए ग्रेड प्राप्त शाळेने दुसºया कमकुवत शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सगुण विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.राज्यातील शाळांची निश्चितीसाठी शिक्षण विभागाच्यावतीने सगुण विकास कार्यक्रम(ट्युनिंग आॅफ स्कूल) राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदासुद्धा सगुण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाद्वारे शाळांना एकमेकांकडून शिकण्यासाठी ट्युनिंग आॅफ स्कूल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रामधून किमान दोन शाळांमध्ये ट्युनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक केंद्रातील शाळा सिद्धीमध्ये ए ग्रेड प्राप्त असणाºया शाळांपैकी एक शाळा जी इतर शाळांना सहकार्य किंवा गुणवत्ता वाढविण्यासाठी भागिदारी करेल. ही शाळा निवडण्याची जबाबदारी संबंधित केंद्र प्रमुखांना पार पाडावी लागणार आहे. अशा दोन शाळांची माहिती केंद्र प्रमुखांकडून भरून घेण्याची जबाबदारी जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे राहणार आहे.ट्युनिंग आॅफ स्कूल कार्यक्रम कागदावरच!गतवर्षीसुद्धा हा कार्यक्रम राबविण्यात आला होता; परंतु यातून कोणतीही फलनिष्पत्ती झाली नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा सिद्धीमध्ये ए ग्रेड प्राप्त शाळेकडून दुसºया शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. जेही प्रयत्न झाले, ते केवळ कागदावरच झाले. प्रत्यक्षात ट्युनिंग आॅफ स्कूल कार्यक्रमानुसार शाळांचे ट्युनिंग जुळलेले दिसून आलेच नाही. त्यामुळे यंदासुद्धा हा कार्यक्रम कागदावरच दर्शविल्या जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा