शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी ‘डॉट्स सेंटर’वर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:03 IST

जिल्ह्यातील महत्वाच्या खाजगी डॉक्टरांकडे ‘डॉट्स सेंटर’ उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

बुलडाणा: जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी क्षयरोग केंद्राकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील दोन हजार ८०० क्षयरुग्णांवर मोफत उपचार सुरू असून आता जिल्ह्यातील महत्वाच्या खाजगी डॉक्टरांकडे ‘डॉट्स सेंटर’ उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. खाजगी डॉक्टरांकडे उपचार सुरू असलेल्या क्षयरुग्णाची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला न दिल्यास त्या डॉक्टरांवर कारवाई होणार आहे.दुर्धर समजल्या जाणारा क्षयरोग बरा होणारा आजार आहे. मात्र या आजाराबद्दल अद्यापही जागृती दिसून येत नाही. क्षयरुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून वारंवार नवनविन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जून महिन्यात जिल्हाभर क्षयरुग्ण शोध मोहीम व तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्णांवर सध्या मोफत उपचार सुरू असून त्यांना पोषण आहारासाठी प्रत्येक महिन्याला ५०० रुपये देण्यात येत आहेत. आता १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खाजगी दवाखाने व मेडीकलवर ‘डॉट्स सेंटर’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. बुलडाणा शहरात तीन ठिकाणी डॉट्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. खाजगी दवाखान्यात असलेल्या डॉट्स सेंटरवर क्षयरुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी महत्वाच्या खाजगी दवाखान्यामध्ये ‘डॉट्स सेंटर’ देण्याच्या हालचाली जिल्हा क्षयरोग केंद्रावर चालू आहेत. खाजगी औषध विक्रेत्यांना डॉट्स प्रोव्हायडर म्हणून कॅट एकचे एक हजार व कॅट दोनचे १ हजार ५०० क्षयरुग्णांचा औषध उपचार पूर्ण केल्यावर औषध विक्रेत्यांना मानधन देण्यात येणार आहे. खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाºया क्षयरुग्णाची माहिती जिल्हा क्षयरुग्ण केंद्रास दिल्यास संबंधीत डॉक्टराला एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र डॉक्टरांनी माहिती दिली नाही, तर भारतीय दंड विधान (१८६० चे ४५) २६९ व २७० नुसार कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरुग्णाची माहिती न देणाºया डॉक्टरवर दंड किंवा शिक्षाही होऊ शकते. 

डॉक्टरांची सीएमईराष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांसाठी नुकतीच खामगाव येथे सीएमई घेण्यात आली. यामध्ये जवळपास ६० डॉक्टरांना मागदर्शन करण्यात आले. क्षयरोग मुक्तीसाठी करण्यात येणाºया प्रयत्नांची पूर्ण माहिती औरंगाबाद येथील डॉक्टरांनी यावेळी दिली. रुग्ण शोधल्यास ५०० रुपयेक्षयरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी व जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक रुग्णांपर्यंत मोफत उपचार पोहचविण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राकडून विविध उपापयोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी टी.बी.चा रुग्ण शोधल्यास ५०० रुपये देण्यात येतील अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यामध्ये डॉट्स सेंटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या बुलडाणा शहरात तीन ठिकाणी सेंटर देण्यात आले आहेत. या सेंटरवर क्षरुग्णांसाठी मोफत उपचार करून देण्यात येतील. -डॉ.मिलींद जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य