गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: January 24, 2017 02:21 IST2017-01-24T02:21:08+5:302017-01-24T02:21:08+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील शिवणी टाका येथील घटना; किरकोळ कारणावरून उद्भवला वाद.

Trying to hit the net | गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

सिंदखेडराजा, दि. २३- तालुक्यातील शिवणी टाका येथे किरकोळ कारणावरून चन्नु मदन चौधरी याचा तिघा व्यक्तींनी हात पाय धरून एकाने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकरणी त्याचा भाऊ रहीम मदन चौधरी यांनी २३ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. शिवणी टाका येथील रहिवासी चन्नु मदन चौधरी (वय २५) २३ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता त्यांच्या मालकीच्या गाई, म्हशी चारावयास घेऊन जात असताना समोरून त्याच रस्त्याने काशिम भिका दर्गेवाले, हुसेन भिका दर्गेवाले व गंगुबाई सलमान चौधरी त्यांची गाई, म्हशी घेऊन येत असताना म्हशीचा एकमेकांना धक्का लागला. या कारणावरून काशिम, हुसेन व गंगुबाई या तिघांनी चन्नु चौधरीला बेदम मारहाण केली

Web Title: Trying to hit the net