इण्डेन गॅस कार्यालयाची भिंत फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 24, 2017 00:29 IST2017-05-24T00:29:53+5:302017-05-24T00:29:53+5:30
डोणगाव : लोणीगवळी रस्त्यावर इण्डेन गॅसचे कार्यालय व गोदाम आहे. २१ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सदर गॅस एजन्सीवरील सीसी कॅमेरे फोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

इण्डेन गॅस कार्यालयाची भिंत फोडण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : लोणीगवळी रस्त्यावर इण्डेन गॅसचे कार्यालय व गोदाम आहे. २१ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सदर गॅस एजन्सीवरील सीसी कॅमेरे फोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
रविवारी सदर कार्यालय बंद असते. याचाच फायदा अज्ञात व्यक्तीने घेतला व येथे वॉचमन नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सीसी कॅमेरे फोडून भिंत फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात व्यक्तीने एजन्सीच्या मागच्या बाजूने भिंत फोडण्याचा हा प्रयत्न केला असून, सदर घटना ही रविवारी दुपारची असल्याने कुणीतरी सदर एजन्सीवर पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी एजन्सीवरील कर्मचारी शेख परवेज शेख अयुब यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.