ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 01:14 IST2017-05-26T01:14:15+5:302017-05-26T01:14:15+5:30
खामगाव : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर टेंभूर्णा शिवारात २५ मे रोजी संध्याकाळी घडली.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर टेंभूर्णा शिवारात २५ मे रोजी संध्याकाळी घडली.
चिंचखेड नाथ येथील रहिवासी अनिल मगन सावंत (वय २१) हा चिंचखेड नाथ परिसरातील खेड्यांमध्ये दुचाकीने जावून स्टोव्ह, मिक्सर, कुकर दुरुस्तीचे काम करीत होता. दरम्यान २५ मे रोजी अनिल सावंत हा नवीनच घेतलेल्या दुचाकीने चिंचखेड नाथ येथून दुचाकीने जात असताना टेंभूर्णा शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनिल सावंत हा जागीच ठार झाला. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.