ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: February 18, 2017 03:23 IST2017-02-18T03:23:19+5:302017-02-18T03:23:19+5:30
ट्रकच्या धडकेत ३0 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मलकापूर, दि. १७- ट्रकच्या धडकेत ३0 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास स्थानिक बसस्थानकाकडे जाणार्या बुलडाणा मार्गावर घडली. मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील पुरुषोत्तम वासुदेव तायडे (३0)त्याचा मित्र हे दोघे दुचाकीने बुलडाणा मार्गाने जात असताना भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पुरुषोत्तम तायडे जागीच ठार झाला. घटनास्थळावरुन पसार होण्याचा प्रयत्न करण्यार्या ट्रक चालकास पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पोलिसांनी पकडले.