ट्रकचे चाक शौचालयाच्या टाकीत अडकले, भिंतीचे नुकसान
By अनिल गवई | Updated: June 6, 2024 19:02 IST2024-06-06T19:02:11+5:302024-06-06T19:02:19+5:30
गुरुवारी सकाळी ही घटना स्थानिक गजानन कॉलनीत घडली.

ट्रकचे चाक शौचालयाच्या टाकीत अडकले, भिंतीचे नुकसान
खामगाव : शौचालयाच्या टाकीत ट्रकचे चाक अडकल्यानंतर ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात घराच्या आवार भिंतीचे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी ही घटना स्थानिक गजानन कॉलनीत घडली.
प्राप्त माहितीनुसार, (एमएच २८ बीबी ३६७७) क्रमांकाचा ट्रक मुरूम घेऊन जात होता. त्यावेळी शौचालयाच्या टाकीत चाक फसल्यामुळे ट्रक उलटला. त्यामुळे गजानन कॉलनीतील सातपुते यांच्या घराच्या आवार भिंतीचे नुकसान झाले.