जांब शिवारात मॅटेडोर-ट्रॅक्टरचा अपघात; दोन गंभीर, तीन जखमी
By Admin | Updated: April 25, 2017 00:34 IST2017-04-25T00:34:15+5:302017-04-25T00:34:15+5:30
धाड : धाड-औरंगाबाद रोडवर जांब गावानजीक ट्रॅक्टर आणि टाटा ४०७ मॅटेडोरचा अपघात होऊन ह्या घटनेत चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

जांब शिवारात मॅटेडोर-ट्रॅक्टरचा अपघात; दोन गंभीर, तीन जखमी
धाड : धाड-औरंगाबाद रोडवर जांब गावानजीक ट्रॅक्टर आणि टाटा ४०७ मॅटेडोरचा अपघात होऊन ह्या घटनेत चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. २४ एप्रिलला पहाटे २ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून, यातील मॅटेडोर हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होते.
प्राप्त माहितीनुसार धाड पो.ठाणे हद्दीत येणाऱ्या जांब शिवारात धाड-औरंगाबाद मार्गावर पहाटे २ वाजता माहोराकडून येणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि धाडवरून माहोराकडे जाणाऱ्या ४०७ टाटा मॅटेडोरचा अपघात घडला. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह मॅटेडोरमधील तीन असे चार जखमी झाले. या ठिकाणी ट्रॅक्टर चालक अमोल शिंदे सातगाव व आकाश खरात, सुगदेव खरात, शिवानंद खरात असे चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बुलडाणा येथे उपचारार्थ हलवण्यात आले. या घटनेची नोंद धाड पोलिसांनी घेतली आहे. तपास धाड पोलीस करत आहेत. जखमीपैकी दोन जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी रवाना केल्याचे समजते. या घटनेची नोंद धाड पोलिसांनी घेतली आहे. तपास धाड पोलीस करत आहे. जखमी पैकी दोन जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी रवाना केल्याचे समजते.