ट्रक-मोटारसायकलची धडक; एक ठार
By Admin | Updated: May 6, 2015 00:25 IST2015-05-06T00:25:09+5:302015-05-06T00:25:09+5:30
हिवरा साबळे फाट्यानजीकची घटना

ट्रक-मोटारसायकलची धडक; एक ठार
डोणगाव : मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे फाट्यानजीक टाटा ४0७ व मोटारसायकलची धडक होऊन १ जण जागेवरच ठार झाल्याची घटना ५ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. हिवरा साबळेकडून एम.एच.२६ एच.३२४५ क्रमांकाचा टाटा ४0७ गिट्टी घेऊन भरधाव वेगाने येत होता. तर एम.एच.३८ एच.२३१६ क्रमांकाच्या मोटारसायकलने संतोष बबन पायघन हे हिवरा साबळेकडे जात होते. दरम्यान टाटा ४0७ व मोटारसायकलची समोरासमोर जबरदस्त धडक झाली. यामध्ये रत्नापूर येथील मोटारसायकल चालक संतोष पायघन हा जागीच ठार झाला. याप्रकरणी भगवान बबन पायघन यांनी डोणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी टाटा ४0७ च्या चालकाविरुद्ध भादंवि कलम ३0४ (अ), २७९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास एएसआय कोरडे हे करीत आहेत.