ट्रकची मोटारसायकलला धडक; दोघे भाऊ जागीच ठार
By Admin | Updated: May 15, 2014 00:11 IST2014-05-15T00:10:59+5:302014-05-15T00:11:27+5:30
मुक्ताईनगरहून मलकापूरकडे येत असलेल्या मोटारसायकलीस ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलीवरील दोघे सख्खेभाऊ जागीच ठार झाले.

ट्रकची मोटारसायकलला धडक; दोघे भाऊ जागीच ठार
मलकापूर : मुक्ताईनगरहून मलकापूरकडे येत असलेल्या मोटारसायकलीस ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलीवरील दोघे सख्खेभाऊ जागीच ठार झाले. ही घटना आज १४ मे रोजी दुपारी २ वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चिखली रणधम वळण फाट्यावर घडली. मुक्ताईनगर जि.जळगाव खा. येथील वार्ड नं.५, सिटफार्म भागात राहणारे अकबरशाह दुल्लाशाह वय ३८ व रहेमनाशाह दुल्लाशाह वय ३६ हे मुलगी पाहण्यासाठी मुक्ताईनगरहून बुलडाणा येथे दुचाकी क्रमांक एमएच १९ बीआर १४७४ ने जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील रणथम (चिखली) वळणावर समोरुन भरधाव येणार्या ट्रक क्रमांक एमपी 0९ एचजी ७0५३ ने अकबरशाह दुल्लाशाह वय ३८ व रहेमनाशाह दुल्लाशाह वय ३६ हे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच १९ बीआर १४७४ ला जबर धडक दिली. धडक देवून ट्रक दोघांच्या अंगावरुन गेल्याने अकबरशाह दुल्लाशाह वय ३८ व रहेमनाशाह दुल्लाशाह वय ३६ या दोघा भावांच्या अक्षरशा चिंधड्या उडाल्या व दोघेही घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. घटनेची माहिती मिळताबरोबर ग्रामीण पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक सरनाईक, पोहेकॉ निंबोळकर, बोराडे, तळोले, ठाकूर, पोकॉ शिंदे आदींनी घटनास्थळी दाखल होवून उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणले. या अपघाताची फिर्याद मृतकाचा भाऊ इरफानशाह दुल्लाशाह रा. मुक्ताईनगर याने दिली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द अप क्र.११/१४ कलम २७९, ३0४ अ, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.