ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:41+5:302021-06-03T04:24:41+5:30

जाफराबाद येथील सैयद हनीफ सैयद अनिस आपल्या ऑटाेने (क्र. एमएच २० बीटी ७१११) कुटुंबासह जालना येथून जाफराबादकडे जात होते. ...

Truck hits autorickshaw; Six injured | ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; सहा जखमी

ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; सहा जखमी

जाफराबाद येथील सैयद हनीफ सैयद अनिस आपल्या ऑटाेने (क्र. एमएच २० बीटी ७१११) कुटुंबासह जालना येथून जाफराबादकडे जात होते. दरम्यान, देऊळगाव राजा वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या टँकरने (क्र. एमएच १२ एसएफ १७२५) रिक्षाला समोरून धडक झाली. या अपघातात सय्यद हनीफ सय्यद अजीज, तरन्नुम बी सय्यद हनीफ, सय्यद अल्तमश सय्यद हनीफ, सय्यद उजैर सय्यद हनीफ, सय्यद मुस्ताकिम सय्यद हनीफ, जिकरा फातेमा सय्यद हनीफ (सर्व, रा. जाफराबाद जि. जालना) गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना जालना येथे हलविले. याप्रकरणी सय्यद हनीफ सय्यद अनिस यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप गुंजकर तपास करीत आहेत.

Web Title: Truck hits autorickshaw; Six injured