ट्रकची समोरासमोर धडक, १ ठार
By Admin | Updated: September 22, 2014 00:34 IST2014-09-22T00:34:04+5:302014-09-22T00:34:04+5:30
मलकापूर नांदूरा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एक ठार तर दोन जखमी.

ट्रकची समोरासमोर धडक, १ ठार
नांदुरा (बुलडाणा) : दोन ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात १ ट्रक चालक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सदर घटना आज २१ सप्टेंबर रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर वडी पुलाजवळ घडली.
ट्रक क्र.डब्ल्यू.बी.३३ सी२६९९ मलकापूरकडे तर ट्रक क्रं.सी.जी.0७ सी ४९५९ नांदुराकडे येत असताना या दोन्ही ट्रकची आज सकाळी नांदुर्यापासून पाच कि.मी. अंतरावर वडी पुलाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक क्र.४९५९ चा चालक शेषलाल नंदकुमार वर्मा (वय ४५) हा घटनास्थळीच ठार झाला. तर दुसर्या ट्रकचा चालक व क्लीनर हे दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने अकोला येथे हलविण्यात आले.