ट्रक जळून खाक
By Admin | Updated: May 30, 2017 19:48 IST2017-05-30T19:48:21+5:302017-05-30T19:48:21+5:30
दुसरबीड : नागपूर - पुणे या महामार्गावर दुसरबीडपासून एक किमी अंतरावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रकला आग लागली. सदर ट्रक जळून खाक झाल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले.

ट्रक जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
दुसरबीड : नागपूर - पुणे या महामार्गावर दुसरबीडपासून एक किमी अंतरावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रकला आग लागली. सदर ट्रक जळून खाक झाल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले.
नागपूर- पुणे या महामार्गावर एमएच १४ ईएम ७८९५ क्रमांकाचा ट्रक दुसरबीडपासून एक किमी अंतरावर जळून खाक झाल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. सदर ट्रकमध्ये कोणते साहित्य होते, याची माहिती घेण्यात येत आहे. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.