ट्रक-दुचाकीचा अपघात; महिला ठार
By Admin | Updated: August 1, 2014 02:20 IST2014-08-01T02:05:54+5:302014-08-01T02:20:22+5:30
सुलतानपूर येथील घटना

ट्रक-दुचाकीचा अपघात; महिला ठार
सुलतानपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना आज ३१ जुलै रोजी सुलतानपूर येथे जालना रोडवर सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. लोणार तालुक्यातील बोरखेडी येथील तेजराव नखाते व त्यांची रूक्मिनाबाई नखाते (४२) हे जालना मार्गावरील सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावरुन मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरुन सुलतानपूरकडे येत होते. वेदांत आश्रमाजवळ मागून भरधाव वेगाने येणार्या डब्ल्यू.बी. २३ सी. १0४१ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात तेजराव नखाते बचावले असले तरी त्यांच्या पत्नी रूक्मिनाबाई नखाते या ट्रकच्या टायरखाली येऊन जागीच ठार झाल्या. याबाबत विनोद साहेबराव शेवाळे यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३0४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन ट्रकचालकास अटक केली आहे. पंचनामा केलेले मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दाम्पत्य चिखली येथील एका नातेवाईकाच्या सावडण्यासाठी जात असताना मध्येच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.