ट्रक व दुचाकीचा अपघात; पत्नी ठार, पती जखमी
By Admin | Updated: November 20, 2015 02:25 IST2015-11-20T02:25:13+5:302015-11-20T02:25:13+5:30
खामगावनजीक अपघात;सुदैवाने ७ वर्षीय मुलगी बचावली.

ट्रक व दुचाकीचा अपघात; पत्नी ठार, पती जखमी
खामगाव: ट्रक व दुचाकीच्या अपघातात पत्नी ठार तर पती जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तरोडा कसबानजीक घडली. सुदैवाने ७ वर्षीय मुलगी मात्र सुखरूप बचावली. स्थानिक संतविहार नगरातील अभिजित बापट (वय ४0) हे पत्नी मेघना (वय ३५) व मुलगी प्रांजल (वय ७ वर्षे) यांना घेऊन खामगावकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील तरोडा कसबानजीक अकोल्याकडे जाणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मेघना बापट हय़ा घटनास्थळीच ठार झाल्या तर अभिजित बापट हे गंभीर जखमी झाले. मुलगी प्राजक्ता नशिबाने बचावली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक जाम झाली होती. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सच्छिंद्र शिंदे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रतिभा यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने खामगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातातील जखमी अभिजित बापट यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंंत याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.