चार वर्षांंपासून बंद पडलेली नळयोजना अखेर सुरळीत!

By Admin | Updated: January 7, 2016 02:19 IST2016-01-07T02:19:33+5:302016-01-07T02:19:33+5:30

साखरखेर्डा येथे अखेर कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरळीत

Troubles stopped after four years. | चार वर्षांंपासून बंद पडलेली नळयोजना अखेर सुरळीत!

चार वर्षांंपासून बंद पडलेली नळयोजना अखेर सुरळीत!

अशोक इंगळे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): साखरखेर्डा गावाची पाणी समस्या दूर करणारी कोराडी प्रकल्पावरील नळयोजना तब्बल चार वर्षांपासून बंद होती. ती योजना स् थानिक ग्रामपंचायतीने अथक परिश्रम घेऊन अखेर सुरु केली. गावात नळाला पाणी येताच बुधवारी ग्रामस्थांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणीत झाला. साखरखेर्डा येथील हक्काचा महालक्ष्मी तलाव आटल्याने नळयोजना बंद झाली होती. गावा तील हातपंप, बोअरवेल बंद पडली, विहिरींनी तळ गाठला. गावातील राजगुरु यांची विहीर काझी यांच्या मालकीच्या विहिरीवर टँकरची लांबच लांब रांग दररोज लागायची. येथून एका टँकरला चार ते पाच तास लाइनमध्ये उभे रहावे लागत असून, त्या विहिरींनी डिसेंबर अखेर तळ गाठल्याने १५0 रुपये ५00 लिटरकरिता मोजावे लागत होते. त्या ५00 लिटर पाण्याकरि ता ५00 रुपये मोजावे लागत आहे. ५00 रुपये मोजूनही पाणी मिळत नसल्याने जीवाची लाही-लाही होत होती. विहीर मालकांनी चक्क तीन रुपये हंडा याप्रमाणे पाणी विकणे सुरु केले होते. त्यामुळे कोरडी योजनाच एकमेव आधार होती. कोराडी प्रकल्पावरून साखरखेर्डापर्यंंंत १२ किमी पाइपलाइन एअर वॉल्व्ह दुरुस्तीकरिता आणि विहिरीवरील मोटरपंप दुरुस्ती, जलशुद्धीकरण यंत्राची दुरुस्तीकरिता दोन महिने लागले. गणेश पळसकर, शालीग्राम गवई, गजानन मगर यांनी दिवसरात्र एक करीत सर्व कामे हा ताळीत ३ जानेवारीला पाणी जलशुद्धी केंद्रापर्यंंंत आणले. २४ तासापैकी ८ तास वीज मिळत असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. वीज वितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीने विनंती करून विहिरीवरील वीज पुरवठा ए.जी.वरून गाव फिडरवर जोडण्याची विनंती केली. या समस्यांची दखल घेत वीज वितरण कंपनीने सकारात्मकपणे तत्काळ निर्णय घेऊन विजेचा प्रश्न ५ जानेवारीला सुटला आणि साखरखेर्डा गावात ६ जानेवारीला नळाला पाणी सुटले. गंभीर पाण्याचा प्रश्न सुटताच महिलांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Troubles stopped after four years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.