राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून माँ जिजाऊंना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST2021-01-13T05:30:53+5:302021-01-13T05:30:53+5:30
सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज व देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे ...

राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून माँ जिजाऊंना मानवंदना
सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज व देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्यासह परिसरातील किनगाव राजा, आडगाव राजा, मेहुणाराजा, उमरद व जवळखेड येथील राजे जाधव परिवारांच्या हस्ते मानाची पूजा संपन्न झाली. माँ जिजाऊंचा जन्मसोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सिंदखेड राजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या जन्मस्थळावरील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच आरती ओवाळून ही पूजा करण्यात आली. कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने या सोहळ्यास मर्यादित स्वरूप दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात व महाराष्ट्राबाहेर स्थायिक असलेले राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज तसेच इतर जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून राजवाड्यामध्ये आयोजित या महापूजेस राजे बाबूराव जाधव, राजे जितेंद्र जाधव, राजे सुभाषराव जाधव, राजे गोपाल जाधव, राजे आनंदराव जाधव, राजे विठ्ठल जाधव, राजे विजय जाधव, राजे बाळासाहेब जाधव व इतर वंशज माँ जिजाऊंना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.