सामुहिक श्रमदानाने कलाम यांना श्रद्धांजली
By Admin | Updated: August 3, 2015 01:20 IST2015-08-03T01:20:56+5:302015-08-03T01:20:56+5:30
शेगाव येथे रविवारीही सुरु होते शाळा, महाविद्यालये !

सामुहिक श्रमदानाने कलाम यांना श्रद्धांजली
शेगाव (जि. बुलडाणा) : माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अतिशय कष्टाळू होते. मेहनत आणि कामावर त्यांची श्रद्धा होती. तथापि, आपल्या मृत्यूनंतर एकही तास सुटी देवू नये तसेच रविवारीही कामकाज करण्यात यावे,अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे शेगाव येथील बुरूंगले शिक्षण संस्थे तील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय रविवार २ ऑगस्ट रोजी सुरू ठेवण्यात आले. यावेळी अध्यापनसोबतच श्रमदान करून विद्यार्थ्यांंनी त्यांना अनोखी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी बुरूंगले शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या श्री. मस्कुजी बिरूजी बुरूंगले विद्यालय, श्री. ज्ञानेश्वर मस्कुजी बुरूंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, श्री. ज्ञानेश्वर मस्कुजी बुरूंगले विज्ञान व कला महाविद्यालय व श्री. रामकृष्ण मस्कुजी बुरूंगले मराठी प्राथमिक शाळेमध्ये एक दिवस अतिरिक्त कामकाज चालविण्यात आले. माझ्या मृत्यूनंतर शासकीय कार्यालयांना, शैक्षणिक संस्थांना सुटी देण्याऐवजी एक तास जास्त काम करून दिलेली श्रद्धांजली मला जास्त आवडेल, असे विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या हयातीत व्यक्त केले होते. या विचाराला अनुसरून बुरूंगले शिक्षण संस्थेने रविवारी शाळा व कॉलेज घेऊन डॉ. कलाम साहेबांचे विचार खर्या अर्थांंंने अंमलात आणले. या कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामविजय बुरूंगले प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील ४३ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी जन्मापासून शेवटच्या क्षणापयर्ंत डॉ. कलाम साहेब कसे जीवन जगले, हे आपल्या मनोगतात व्यक्त केले. श्रद्धांजलीचे औचित्य साधून बुरूंगले शिक्षण संस्थेत स्वच्छता अभियान, श्रमदान आणि वृक्षारोपण अशी विविध उपक्रमेही राबविण्यात आली.