राजीव सातव यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST2021-05-28T04:25:55+5:302021-05-28T04:25:55+5:30

चिखली : अ.भा. काँग्रेसचे निमंत्रक, गुजरात राज्याचे प्रभारी खासदार स्व. राजीव सातव यांचे अंतिम दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा होती. ...

Tribute of all parties to Rajiv Satav! | राजीव सातव यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली !

राजीव सातव यांना सर्वपक्षीयांची श्रद्धांजली !

चिखली : अ.भा. काँग्रेसचे निमंत्रक, गुजरात राज्याचे प्रभारी खासदार स्व. राजीव सातव यांचे अंतिम दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा होती. परंतु, कोरोना महामारीमुळे अनेकांना त्यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित राहता आले नाही. त्या अनुषंगाने राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे दर्शन व सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक माळीभवन येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन करून आदराजंली वाहण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविक काँग्रेस सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष तथा श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने यांनी केले. दरम्यान, तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, राष्ट्रवादीचे संजय गाडेकर, शिवसेनेचे श्रीराम झोरे व भाजपाचे कुणाल बोंद्रे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Tribute of all parties to Rajiv Satav!