शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आदिवासी वस्तीतील विद्यार्थी ‘इंटरनॅशनल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:05 PM

८० टक्के आदिवासी बहुल वस्तीत असलेल्या या शाळेसोबत विद्यार्थीही आता ‘इंटरनॅशनल’ झाले आहेत.

बुलडाणा : लोणार तालुक्यातील टिटवी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेत आहेत. येथे डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला जातो. ८० टक्के आदिवासी बहुल वस्तीत असलेल्या या शाळेसोबत विद्यार्थीही आता ‘इंटरनॅशनल’ झाले आहेत.आदिवासी वस्तीतील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे हे मोठे यश समजल्या जाते. परंतू लोणार तालुक्यातील टिटवी येथील जिल्हा परिषद शाळेने या पालिकडे काम केले आहे. टिटवी या आदिवासी बहुल वसतीतील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणलेच; शिवाय शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणे हे मोठे यशाचे गमक आहे. एक विद्यार्थी स्थलांतरित होऊ नये व शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी हंगामी वसतिगृह सुद्धा याच शाळेमध्ये चालवले जाते. दोन विद्यार्थ्यांना परिसराचे ज्ञान व्हावे, यासाठी शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात. शाळा डिजिटल झाली; शिवाय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी जि. प. शाळेने उपलब्ध केली. इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांनाही लाजवेल अशी ही शाळा आहे.

‘लीप फोर वर्ड’ची किमयाविद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान व्हावे, यासाठी ‘लीप फोर वर्ड’चा उपक्रम टिटवी येथील जि. प. शाळेत राबविण्यात येत आहे. त्यामुळे मुले या शाळेतील सर्वच मुले अगदी सहजरित्या कुठल्याही शब्दाचे स्पेलींग तयार करतात. इंग्रजी शब्दसाठा वाढविण्यासाठी मोठी मदत विद्यार्थ्यांना होत आहे. इयत्ता तिसरीच्या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.गावातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी ही शाळा सतत प्रयत्नशील असते. यामुळे आदीवासी मुले शिक्षण क्षेत्रात पूढे येतील हे मात्र निश्चित.-गोदावरी कोकाटे, जि. प. सदस्य.शाळेच्या या यशामागे लोकसहभागही महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो--विजय सरकटे, मुख्याध्यापक

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाLonarलोणार