आदिवासींचा आरक्षण बचाव मोर्चा
By Admin | Updated: August 23, 2014 02:06 IST2014-08-22T23:45:33+5:302014-08-23T02:06:37+5:30
जळगाव जामोद येथे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

आदिवासींचा आरक्षण बचाव मोर्चा
जळगाव जामोद: आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने गुरूवार २१ रोजी प्रमुख मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाला कॉटन मार्केट येथून सुरूवात झाली. त्यानंतर उपविभागीय महसुल कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यामध्ये जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बहूसंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले होते. उपविभागीय महसुल कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर उपविभागीय अधिकारीतर्फे नायब तहसिलदार अ.वा. सोळंके यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. धनगर व तत्सम जातीचा बिगर आदिवासी जातीचा समावेश आदिवासीच्या सुचित करू नये, बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालय असावे, पारधी पॅकेज अंतर्गत ५00 घरकुलांचे बांधकाम त्वरीत करावे, जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील प्रलंबित दारिद्रय रेषेखालील अर्जावर त्वरीत कार्यवाही करून प्रमाणपत्र द्यावे, आदिवासी विकास आराखडा संपुर्ण राज्यात लागू करावा यासह अठरा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या मोर्चात आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती प्रमुख प्यारेलाल डाबेराव, उपप्रमुख हुसेन पालकर, बुलडाणा येथील दिलीप मोरे, संतोष शेले, संतोष पवार, चंदनसिंग डाबेराव, सौ.आशा डाबेराव, रमेश सोळंके, शारदाताई कुवारे, श्याम भास्कर, अरूण चव्हाण, सुर्यभान राठोड, पार्वताबाई मावस्कार, उषाताई चव्हाण, सुनील डाबेराव, समशेर तडवी, मारोती कासदेकर, गंभीर घट्टे यांच्यासह हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चात राणी दुर्गावती यांच्या वेशभुषेतील कु.अनुराधा डाबेराव व बिरसामुंडा यांच्या वेशभुषेतील सुमीत चव्हाण हे विशेष आकर्षण ठरले.