शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सोशल मिडीयावर वाढला चॅलेजचा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:16 PM

काही दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेंज, बहीण भाऊ चॅलेंज, सिंगल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, खाकी चॅलेंज सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत काही दिवसांपासून फेसबुक व इतर समाज माध्यमांवर विविध चॅलेंजचा ट्रेंड वाढत आहे. या चॅलेंज अंतर्गंत अनेक मुली आणि महिला आपले फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. मात्र, या फोटांचा दुरपयोग करून मुलींना ब्लॅकमेल करणारेही सक्रीय असल्याने पोलिसांनी सावधगीरी बाळगण्याची सुचना केली आहे.अनलॉक सुरू झाले असले तरी अनेक जण घरातच राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे, घरात राहत असलेले अनेक जण सोशल मिडीयावरच वेळ घालवत आहे. काही दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेंज, बहीण भाऊ चॅलेंज, सिंगल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, खाकी चॅलेंज सुरू आहे. घरातच वेळ घालवणाऱ्यांसाठी हे चॅलेंज विरंगुळा वाटत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ््या चॅलेंजच्या माध्यमातून महिला आणि मुली आपले फोटो समाज माध्यमावर अपलोड करीत आहेत. मात्र, या फोटोंचा दुरपयोग करून महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करणारेही सक्रीय आहेत. त्यामुळे, असे फोटो टाकताना महिला आणि मुलींनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कपल चॅलेंज किंवा फॅमिली चॅलेंज नावाने सर्च केल्यास अनेक महिला आणि मुलींचे फोटो सहज समाज माध्यमावर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे, काही विकृत या संधीचा लाभ घेउन महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करू शकतात. फोटो अपलोड करताना काळजी घेण्याचे तसेच कुणी ब्लॅक करीत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे.

असा आहे ट्रेंडगत काही दिवसांपासून फेजबुकवर विविध चॅलेंज देण्यात येत आहे. या चॅलेंज अंतर्गंत अनेक जण पती-पत्नीबरोबरचे फोटो तर काही मुली नववारी, तसेच पाश्चिमात्य कपड्यांवर फोटो अपलोड करीत आहेत. चॅलेंज स्विकारण्याच्या नादात अनेक मुली फोटो अपलोडचा धोका पत्करत आहेत.असा होऊ शकतो दुरपयोगफेसबुक हे जगभरात पाहता येते. त्यामुळे, आतापर्यंत घडलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये देशाबाहेरील आरोपीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. फेसबुकवर कपल चॅलेंजने सर्च केल्यास अनेक दाम्पत्याचे फोटो येतात. या फोटोमधील महिलांचे फोटो मार्फ (एडीट) करून दुसºया महिलेच्या जागेवर ठेवू शकतात. तसेच त्यांना सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करू शकतात.

महिलांनी सावधगीरी बाळगावीसोशल मिडीयावर फोटो अपलोड करताना त्या वेबसाईटीची विश्वासहार्यता तपासून पहावी. तसेच फोटो अपलोड करताना महिला आणि मुलींनी काळजी घ्यावी. ज्यांनी फोटो अपलोड केले आहेत त्यांना कुणी ब्लॅकमेल करीत असेल तर तक्रार करावी,असे आवाहन पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, सायबर सेलचे ठाणेदार ठाकूर यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocial Mediaसोशल मीडिया