शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 17:29 IST

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत ...

ठळक मुद्देराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते.उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वनशेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकºयांना आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्वत करण्यासह शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणाºया वन शेती उपअभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकºयांच्या जमीनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजिविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. जिल्ह्यात वन शेती उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.  शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्याकरीता वनशेतीसाठी शासकीय रोपवाटीकेतून रोपे देण्यात येत आहेत.  आठ कोटी रुपये निधीवृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे नियम शिथिल करणाºया राज्यांत हे उपअभियान राबवण्यात येते. या अभियानासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात सुमारे ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार सध्या राज्यभर वनशेती उपअभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. 

वन शेती उपअभियान अंतर्गत विविध रोपे शासकीय फळरोपवाटीकेमध्ये उपलब्ध आहेत.  लागवडीसाठी शेतकºयांना टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. - मयुरी खलाणे, कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटीका बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलagricultureशेती