वृक्ष लागवड योजना संशयाच्या भोवऱ्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 05:35 PM2019-03-15T17:35:16+5:302019-03-15T17:35:27+5:30

खामगाव :  नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाला असून, वृक्ष लागवड आणि वृक्षाच्या देखभालीसाठी मजूरही कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

Tree planting scheme is in doubt! |  वृक्ष लागवड योजना संशयाच्या भोवऱ्यात!

 वृक्ष लागवड योजना संशयाच्या भोवऱ्यात!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

खामगाव :  नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाला असून, वृक्ष लागवड आणि वृक्षाच्या देखभालीसाठी मजूरही कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. वृक्ष लागवड आणि वृक्ष देखभालीचा मोठा घोळ उपलब्ध दस्तवेजावरून उघडकीस आला असून, सामाजिक वनीकरणाच्या अधिकाºयांनी संगनमताने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ‘कुंपना’नेच शेत खाल्ल्याने नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड योजना वांद्यात सापडल्याचे चित्र आहे.

नांदुरा तालुक्यात नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत खैरा ते फुली, तरवाडी ते भोटा, महाळुंगी ते लोणवडी, महाळुंगी ते तरवाडी, अलमपूर ते पलसोडा, बेलुरा ते टाकरखेड, वडाळी फाटा ते माळेगाव फाटा आणि इतर क्षेत्रावर  वृक्ष लागवडीकरीता, रेखांकन करणे, खड्डे खोदणे, वृक्ष वाहतूक, लागवड, आळे करणे, मातीची भर लावणे, आधार लावणे यासारख्या कामांसाठी स्थानिक व आसपासच्या गावातील मजून न लावता तब्बल १५ ते २० कि.मी. अंतरावरील नांदुरा, दहीवडी येथील मजूर दाखविण्यात आले. हजेरी पत्रकात नावे असलेले मजूर उपरोक्त क्षेत्रावर एकदाही हजर झाले नाहीत. त्यांनी झाडेही लावली नाहीत. तसेच काही ठिकाणी लावलेल्या झाडांची देखभालही केली नाही. त्यामुळे उपरोक्त क्षेत्रांपैकी अनेक साईट ओस पडल्यात. दरम्यान, लोणार येथील बदलीनंतरही वनरक्षकाने दीड महिना नांदुरा येथे काम केले. वनरक्षक राजेश सिरसाट यांनीच सुमारे दीड महिना रोजंदारी मस्टर आणि इतर देयके काढलीत. त्यामुळे याठिकाणी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. मात्र, वरिष्ठांच्या वरदहस्तांमुळे या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याची मागणी आहे.

 

वृक्ष लागवडीच्या रक्कमांमध्ये तफावत!

वनक्षेत्रपालांची मर्जी संपादन करीत, वनरक्षकाने कामावर जवळच्या मजुरांऐवजी नांदुरा आणि दूरवरच्या मजुरांचा समावेश केला. त्यांच्या नावे कागदोपत्री देयकेही काढली.  प्रत्यक्षात खर्च झाल्यापेक्षा कितीतरी पट अधिक रक्कमांचा यामध्ये समावेश असल्याचेही उपलब्ध दस्तवेजावरून दिसून येते.

 

ट्री-गार्ड खरेदीही कागदोपत्री!

झाडांच्या संरक्षणासाठी गेल्या काही वर्षांत नांदुरा सामाजिक वनीकरण विभागाकडून हजारो ट्री-गार्डची खरेदी करण्यात आली. यासाठी मोठ्याप्रमाणात निधी खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही क्षेत्रावरील वृक्षांना ट्री-गार्ड लावण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ट्री-गार्ड खरेदीतही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची चर्चा आहे.

 

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय वाºयावर!

नांदुरा येथे काही महिन्यांपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मंजुर झाले. त्यानंतर कार्यालय कार्यान्वितही झाले. मात्र, नांदुरा येथील कार्यालयात वनपरीक्षेत्र अधिकारी कधीच कार्यालयात उपलब्ध होत नाही. शिवाय, मोठ्या हनुमान मंदिरा मागील परिसरात असलेल्या या कार्यालयावर अद्यापपर्यंत साधा फलकही लावण्यात आलेला नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.


 

नांदुरा परिक्षेत्रातील वृक्ष लागवड योजनेसंदर्भातील इत्यंभूत सविस्तर माहिती दिली जाईल. यासंदर्भात सविस्तर चौकशी करून आपणास लवकरच कळविले जाईल.

- एस.के.काळुसे, वन परिक्षेत्र अधिकारी, नांदुरा/ मलकापूर

Web Title: Tree planting scheme is in doubt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.