श्रमदान व स्वखर्चाने केला शाळेचा कायापालट

By Admin | Updated: December 11, 2015 02:35 IST2015-12-11T02:35:12+5:302015-12-11T02:35:12+5:30

सिंदखेड मित्रमंडळाचा उपक्रम

Transformation of School of Labor and Self-Employment | श्रमदान व स्वखर्चाने केला शाळेचा कायापालट

श्रमदान व स्वखर्चाने केला शाळेचा कायापालट

धामणगाव बढे (जि. बुलडाणा): मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळेचा कायापालट सिंदखेड येथील सरपंच विमल कदम यांनी स्वखर्चाने तर सिंदखेड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांंनी श्रमदानाने केला. सिंदखेड येथील जि.प. मराठी शाळेचा मोठा परिसर असून, अंगणवाडी व मराठी शाळा एकाच ठिकाणी आहेत. शाळेला मोठे मैदान आहे; परंतु मागील काही वर्षांंपासून शाळा परिसरात अस्वच्छता होती. नवनियुक्त सरपंच विमल कदम तथा सिंदखेड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांंना ही बाब खटकली. सरपंच विमल कदम यांनी या कामासाठी लागणारा २५ हजार रुपये खर्च स्वत: दिला. तर कार्यकर्त्यांंनी श्रमदानातून शाळेचा परिसर स्वच्छ केला. यावेळी शाळा, अंगणवाडी येथील खोल्यांना रंग देण्यात आला. मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले. शाळा परिसरात असलेल्या अनेक झाडांना रंग देण्यात आला. शाळेमध्ये पाणी, वीज याची कामे करण्यात आली. त्यामुळे या शाळेचा कायापालट झाला. या शाळेमध्ये १ ते ४ मराठी शाळेची मुले व अंगणवाडीची मुले शिक्षण घेत आहेत. तर शाळेला दिला जाणारा पोषण आहारदेखील चांगला असावा यासाठी गावकरी काळजी घेतात. शाळेतील विद्यार्थ्यांंना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे यासाठी लागणार्‍या साहित्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत असल्याची माहिती सिंदखेड मित्रमंडळाचे कार्यकर्ते विनोद कदम, योगेश मोरे यांनी दिली. जि.प. मराठी शाळेचा कायापालट करण्यासाठी सरपंच विमल कदम, उपसरपंच ज्योती मोरे, विनोद कदम, योगेश मोरे, गजू लवकर, राहुल जाधव, राहुल म्हस्के, पवन गरुल, सचिन जाधव, विकास बावणे, निकी आवटे, राम लवकर, अक्षय मोरे, अजय मराठे, अजय कापसे, भागवत कापसे, सुनील मोरे, संदीप दांडगे, देवीदास कापसे, संतोष लामखडे, राजू लवांडे, किशोर गडाख, ज्ञानेश्‍वर खराटे, ज्ञानेश्‍वर बावणे, पवन म्हस्के, पवन गडाख, दिलीप मोरे, दीपक लवांडे, दीपक शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांंनी परिश्रम घेतले.

Web Title: Transformation of School of Labor and Self-Employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.