बदल्या झाल्या, गणेशोत्सवानंतर होतील पाेलीस अधिकारी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:40 IST2021-09-14T04:40:29+5:302021-09-14T04:40:29+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस ...

Transfers will be made, after Ganeshotsav, Paelis officers will be recruited | बदल्या झाल्या, गणेशोत्सवानंतर होतील पाेलीस अधिकारी रुजू

बदल्या झाल्या, गणेशोत्सवानंतर होतील पाेलीस अधिकारी रुजू

बुलडाणा जिल्ह्यातील २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. बुलडाणा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सुदाम बरकते यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परभणी जिल्ह्याचे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पद सांभाळणारे श्रवण एस. दत्त यांची आता अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा, (खामगाव) येथे बदली करण्यात आली आहे, तर रमेश बरकते यांच्या जागी अकोला येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम सांभाळलेले सचिन तुकाराम कदम यांची बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी गणेशोत्सवानंतर रुजू होणार आहेत.

Web Title: Transfers will be made, after Ganeshotsav, Paelis officers will be recruited