बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या
By Admin | Updated: April 8, 2017 17:35 IST2017-04-08T17:35:12+5:302017-04-08T17:35:12+5:30
दिपक बाजड यांची बदली देऊळगांव राजा येथे तहसिलदार पदावर करण्यात आलेली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या
बुलडाणा : विभागीय आयुक्त, अमरावती विभाग अमरावती यांच्या आदेशानुसार तहसिलदार यांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले असून तहसिलदार बुलडाणा पदावर कार्यरत असलेले दिपक बाजड यांची बदली देऊळगांव राजा येथे तहसिलदार पदावर करण्यात आलेली आहे.
अमरावती येथे तहसिलदार पदावर कार्यरत असलेले सुरेश बगळे यांची अमरावती येथून तहसिलदार बुलडाणा पदावर बदली झालेली आहे. बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार ( महसूल) पदावर कार्यरत असलेले मनिष गायकवाड यांची तहसिलदार चिखली पदावर बदली करण्यात आलेली आहे. तहसिलदार चिखली विजय लोखंडे यांची खरेदी अधिकारी पदावर जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे बदली करण्यात आलेली आहे.07 एप्रिल रोजी . सुरेश बगळे यांनी तहसिलदार बुलडाणा पदाचा कार्यभार स्विकारला. तर. दिपक बाजड हे कार्यमुक्त झाले असून त्यांनी तहसिलदार देऊळगांव राजा पदाचा प्रभार घेतला. तहसिल कार्यालय बुलडाणा येथे दिपक बाजड यांचा निरोप समारंभ तसेच सुरेश बगळे यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी सदर समारंभास . गणेश माळी, अजित शेलार, . शाम भांबळे, डी. के. इंगळे, नायब तहसीलदार से.नि. नायब तहसीलदार देवकर तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व मंडळ अधिकारी व तलाठी हजर होते.