ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये पश्चिम वऱ्हाडाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:10 PM2020-08-11T13:10:02+5:302020-08-11T13:10:13+5:30

अकोला जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना त्या पदावर कोणताही अधिकारी या बदली प्रक्रीयेतून मिळाला नाही. 

In the transfers of the Rural Development Department, the West Varhada will be replaced | ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये पश्चिम वऱ्हाडाला ठेंगा

ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये पश्चिम वऱ्हाडाला ठेंगा

Next

खामगाव : ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र विकास सेवेतील गट अ पदांच्या २५ अधिकाºयांच्या  १० आॅगस्ट रोजी केलेल्या बदली प्रक्रीयेत अमरावती विभागाला ठेंगा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना त्या पदावर कोणताही अधिकारी या बदली प्रक्रीयेतून मिळाला नाही. 
चालू वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यातच अधिकारी-कर्मचाºयांच्या बदल्या केल्यास त्यांना प्रशासकीय बदलीचा खर्च देता येणार नाही, या कारणासाठी ३१ मे पर्यंत होणारी सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रीयाही पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १५ टक्क्यांच्या मर्यादेत विनंती बदल्या करण्याची सूट  देण्यात आली. तर महसूल व ग्रामविकास विभागातील अधिकाºयांच्या बदल्याही  करण्यात आल्या. शासनाच्या या बदली प्रक्रीयेत विदर्भातील रिक्त पदांवर अधिकारी मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यातून विदर्भात असलेले अधिकारीच इतरत्र गेले आहेत. तर अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये ग्रामविकास विभागातील गट-अ मधील अधिकाºयांची  अनेक पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांवरही  कोणाचीही नियुक्ती या बदली प्रक्रीयेत झाली नाही. त्यामुळे या बदली प्रक्रीयेत पश्चिम वºहाडाला ठेंगाच दाखवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 
या बदल्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून वाशिम मानोरा येथे एका गटविकास अधिकाºयाची बदली झाली आहे. तर नागपूर जिल्ह्यातून एकाची  अहमदनगर, अमरावती जिल्ह्यातील धामनगाव रेल्वेचे गटविकास अधिकारी देवळी येथे गेले. त्यांच्या जागेवर अमरावती येथून मग्रारोहयोचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकाची  बदली  झाली  आहे. 
२५ अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये विदर्भातून अधिकारी बाहेर गेले आहेत. कुणीही विदर्भात आले नाही. त्यातच अमरावती विभागात रिक्त पदांची संख्या मोठी  असताना त्या पदावरही अधिकारी न देता ती  रिक्त ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विदर्भातील समस्या कायमच राहणार आहेत.

Web Title: In the transfers of the Rural Development Department, the West Varhada will be replaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.