दोन मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या!

By Admin | Updated: June 2, 2017 00:32 IST2017-06-02T00:32:48+5:302017-06-02T00:32:48+5:30

वऱ्हाडे नवे निवासी उपजिल्हाधिकारी

Transfers of officials with two Chiefs! | दोन मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या!

दोन मुख्याधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव व देऊळगाव राजा या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या १ जून रोजी झाल्या. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गिरी यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोला येथील जिल्हा क्रीडा अधिकारी रूजू होणार आहेत.
देऊळगाव राजा येथील मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची खामगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली, तर खामगाव येथील मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची बदली चिखलदरा येथे मुख्याधिकारी म्हणून झाली आहे.
यवतमाळ येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ए. के. इंगोले यांची बुलडाणा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तसेच वर्धा येथील जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी यांची बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये बदली झाली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी टापरे यांची बदली बुलडाणा उपविभागीय अधिकारी म्हणून झाली असून, त्यांच्या जागी अमरावती येथील वऱ्हाडे रूजू होणार आहेत.
जिल्ह्यात गत एक महिन्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यपालन अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Web Title: Transfers of officials with two Chiefs!