जिल्ह्यातील चार पाेलीस निरीक्षकांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:23+5:302021-02-05T08:35:23+5:30
जलंब पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. विशेष म्हणजे लाचखोर पोलिसाच्या विरोधात एसीबीकडे तक्रारकर्तासुद्धा ...

जिल्ह्यातील चार पाेलीस निरीक्षकांची बदली
जलंब पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. विशेष म्हणजे लाचखोर पोलिसाच्या विरोधात एसीबीकडे तक्रारकर्तासुद्धा पोलीसच होता. त्यामुळे जलंबचे ठाणेदार पांडुरंग इंगळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे धीरज बांडे यांची जलंबच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलकापूर शहर ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासूनच कैलास नागरे चर्चेत राहिले. त्यांचीही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी प्रल्हाद काटकर यांच्याकडे मलकापूर शहर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत वाळूतस्करी व एका क्लबवर धाड फार चर्चेत राहिली होती. अंढेरा ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर चिखली ठाण्यातील राजवंत आठवले यांची बदली करण्यात आली आहे. हिवरखेडचे ठाणेदार एकनाथ बावस्कर यांची बदली बुलडाणा ग्रामीण ठाण्यात करण्यात आली आहे. बुलडाणा ग्रामीण ठाण्यातील हरिविजय बोबडे यांची हिवरखेड येथे बदली करण्यात आली आहे.