शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बुलडाणा जिल्ह्यात दररोज शेकडो वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:24 IST

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी प्रशासन तत्पर असले तरी नागरिक मात्र बेफिकीर असल्याचा प्रत्यय येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘कोरोना’ बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता जिल्ह्यातील प्रमाण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरी भागात १०० टक्के ‘लॉकडाउन’चे आदेश दिले आहेत. नागरिकांकडून या आदेशाचे सतत उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरात पोलिसांकडून दररोज शेकडो वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी प्रशासन तत्पर असले तरी नागरिक मात्र बेफिकीर असल्याचा प्रत्यय येत आहे.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २१ वर पोहचला आहे. यामध्ये बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, चिखली, चितोडा गाव, मलकापूर, शेगाव शहर इत्यादी ७ ठिकाणी रुग्ण आढळून आलेले आहेत. जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मोताळा, मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये सध्या एकही ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण नाही. मात्र तरीदेखील कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी सर्वांनाच खबरदारी घेण्याची गरज आहे. बंदी असताना नागरिक दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत आहे. जिल्ह्यातील सर्व शहरी भागात दररोज जवळपास शेकडो दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन तत्पर असले तरी नागरिक मात्र बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे.

जीवनावश्यक वस्तू घरपोच!नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने शहरी भागात जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किराणा, भाजीपाला व दूध विक्रेत्यांचे क्रमांकही सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आले आहे. मात्र काही नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याने नियमाचे उल्लंघन होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाtraffic policeवाहतूक पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या