शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात ६४ वर्षांपासून जोपासली जात आहे सर्वधर्मसमभाव प्रार्थनेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:55 IST

महामानवांना अभिवादन करण्यासाठी येथील भारत परिवारातर्फे १९५४ पासून दरवर्षी १ आॅगस्टला सर्वधर्मसमभावाची राष्ट्रीय प्रार्थना घेण्यात येते.

ठळक मुद्दे६४ वर्षापासून या उपक्रमामध्ये दरवर्षी विविध मान्यवर सहभाग घेत असून, जागतिक शांततेसाठी प्रार्थना करतात.महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दिव्यांची आणि विविध फुलांची आरास करून जागतिक शांततेसाठी या प्रार्थनेला सुरुवात होते.

बुलडाणा : ज्या महामानवांनीे मानवी जीवन जगण्यासाठी सुकर व समृद्ध केले. असीम त्याग आणि बलिदान समाजामध्ये शाश्वत मूल्यांची पेरणी केली. त्या महामानवांना अभिवादन करण्यासाठी येथील भारत परिवारातर्फे १९५४ पासून दरवर्षी १ आॅगस्टला सर्वधर्मसमभावाची राष्ट्रीय प्रार्थना घेण्यात येते. मागील ६४ वर्षापासून नियमित राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये दरवर्षी विविध मान्यवर सहभाग घेत असून जागतिक शांततेसाठी प्रार्थना करतात. बुलडाणा शहरासाठी एक संस्कार शाळा म्हणून भारत विद्यालय हे ओळखले जाते. या भारत विद्यालयातील अनेक चाकोरीबाहेरील उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणून सर्व राष्ट्रीय महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दिव्यांची आणि विविध फुलांची आरास करून जागतिक शांततेसाठी या प्रार्थनेला सुरुवात होते. आॅगस्ट महिना हा क्रांतीचा महिना. याच महिन्यामध्ये चले जावची चळवळ झाली होती व अनेक महात्मे याच महिन्यात जन्माला आले होते. या महात्म्यांना व क्रांतिकारकांच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी या दिवशी भल्या पहाटे ही प्रार्थना घेतल्या जाते. प्रार्थना ही मन:शांतीसाठी असते, एकाग्रतेसाठी असते व ती आदरभाव व्यक्त करण्यासाठी असते. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय चांगला प्रकार म्हणजे प्रार्थना. या प्रार्थनेच्या माध्यमातून देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थनेमध्ये ‘धागा धागा अखंड विणूया’ हे गीत संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन आगाशे यांनी घेतल्यानंतर ‘हे मालिक तेरे बंदे हम’ ही समूह स्वरात प्रार्थना घेण्यात आली. या प्रार्थनेला प्रमुख अतिथी म्हणून यावर्षी येथील वेद विद्यालयाचे सतीष करंडे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनामध्ये विज्ञाना सोबतच आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, असे विचार मांडले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पालवे यांच्या हस्ते यावेळेस करंडे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील व भारत विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अखंडीत परंपरेची जोपासना

भारत विद्यालयात भारत परिवारातर्फे प्रार्थनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविधांगी संस्कार करणारी अशी ही शाळा गेल्या ६४ वषार्पासून सर्वधर्मसमभावाच्या प्रार्थनेची आपली एक वेगळी परंपरा जोपासत आहे . या प्रार्थनेला बुलडाणा शहरातील निवडक निमंत्रित व विद्यार्थी शिक्षक वृंद दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अशी परंपरा जोपासणारी परिसरातील भारत विद्यालय एकमेव शाळा असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा