शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

कासारखेडे येथे १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:24 IST

मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे गेल्या १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम असून गावात जातीय सलोख्याच्या वातावरणामुळे कासारखेड गाव इतर गावांसाठी आदर्श ठरले आहे.

ठळक मुद्देजातीय सलोख्याच्या वातावरणामुळे ठरले आदर्श लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून कबड्डीसामन्याचे आयोजन 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे गेल्या १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम असून गावात जातीय सलोख्याच्या वातावरणामुळे कासारखेड गाव इतर गावांसाठी आदर्श ठरले आहे.कासारखेड या गावात धार्मिक कार्यक्रम, उत्सव असे कार्यक्रम सर्व गावकरी एकत्रित येऊन साजरे करतात. लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून या गावात गेल्या १६ वर्षापासून संपूर्ण गावातून गणेशाची एकच मुर्ती स्थापन करुन गणेशोत्सव सामुहिकपणे साजरा करतात. उत्सवादरम्यान कोणताही वादन करता शांततेत हा उत्सव साजरा होतो. यावर्षी लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून कबड्डीसामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ९ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये, तृतीय ५ हजार १ हजार रुपये तसेच बजरंग बलीची प्रतिमा भेट देण्यात येणार आहे. तरी या गणेश उत्सवामध्ये सतत १० दिवस सहभाग घ्यावा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य गणेश मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र नवघरे उपाध्यक्ष श्याम गोरे, सचिव विशाल मवाळ, कोषाध्यक्ष समाधान मवाळ, सदस्य आत्माराम मवाळ, मंगेश मवाळ, शंकर मवाळ, प्रदिप मवाळ, भागवत मवाळ तथा सर्व गावकºयांनी केले आहे. यावर्षी गणेश स्थापना झाल्यानंतर गणरायाची पहिली आतरी सतिश मवाळ यांचे हस्ते करण्यात आली.