कासारखेडे येथे १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:24 IST2017-08-27T19:23:39+5:302017-08-27T19:24:38+5:30
मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे गेल्या १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम असून गावात जातीय सलोख्याच्या वातावरणामुळे कासारखेड गाव इतर गावांसाठी आदर्श ठरले आहे.

कासारखेडे येथे १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे गेल्या १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम असून गावात जातीय सलोख्याच्या वातावरणामुळे कासारखेड गाव इतर गावांसाठी आदर्श ठरले आहे.
कासारखेड या गावात धार्मिक कार्यक्रम, उत्सव असे कार्यक्रम सर्व गावकरी एकत्रित येऊन साजरे करतात. लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून या गावात गेल्या १६ वर्षापासून संपूर्ण गावातून गणेशाची एकच मुर्ती स्थापन करुन गणेशोत्सव सामुहिकपणे साजरा करतात. उत्सवादरम्यान कोणताही वादन करता शांततेत हा उत्सव साजरा होतो. यावर्षी लोकमान्य गणेश मंडळाच्या माध्यमातून कबड्डीसामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ९ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये, तृतीय ५ हजार १ हजार रुपये तसेच बजरंग बलीची प्रतिमा भेट देण्यात येणार आहे. तरी या गणेश उत्सवामध्ये सतत १० दिवस सहभाग घ्यावा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य गणेश मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र नवघरे उपाध्यक्ष श्याम गोरे, सचिव विशाल मवाळ, कोषाध्यक्ष समाधान मवाळ, सदस्य आत्माराम मवाळ, मंगेश मवाळ, शंकर मवाळ, प्रदिप मवाळ, भागवत मवाळ तथा सर्व गावकºयांनी केले आहे. यावर्षी गणेश स्थापना झाल्यानंतर गणरायाची पहिली आतरी सतिश मवाळ यांचे हस्ते करण्यात आली.