ट्रॅक्टरने पोहोचविले सीलबंद मतदानयंत्र!

By Admin | Updated: August 6, 2015 00:33 IST2015-08-06T00:33:37+5:302015-08-06T00:33:37+5:30

नाल्याच्या पुरामुळे रात्रभर जागले कर्मचारी.

Tractor delivered sealed polling machine! | ट्रॅक्टरने पोहोचविले सीलबंद मतदानयंत्र!

ट्रॅक्टरने पोहोचविले सीलबंद मतदानयंत्र!

नांदुरा (बुलडाणा) : तालुक्यातील अलमपूर गावाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे ४ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्‍यांना नांदुरा तहसील गाठता आले नाही. त्यामुळे या चमुला रात्रभर मतदान केंद्रातच मुक्काम करावा लागला.
मंगळवारच्या पहाटेपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नदी- नाले दुथडी वाहून पूर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच पुरामुळे वाहतूक खोळंबल्याने याचा फटका मतदान केंद्रावर असलेल्या चमूला सुध्दा बसला.
४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मतदानानंतर या चमूला निवडणूक साहित्य नांदुरा येथील तहसील कार्यालयात पोहोचवावे लागणार होते; मात्र अलमपूर नजीकच्या नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. तसेच नांदुर्‍याकडे येणार्‍या दुसरा पर्यायी रस्ता सुध्दा उपलब्ध नव्हता. त्यामुळे मतदान केंद्रावरील चमुंना मतदान केंद्रातच मुक्काम करावा लागला. अखेर ५ ऑगस्टच्या पहाटे ट्रॅक्टरच्या मदतीने मतदानाचे साहित्य व कर्मचारी यांना नाल्याच्या पुरातून सुखरुप पैलतिरावर पोहचविण्यात आले. अलमपूर ग्रामपंचायतच्या तीन वॉर्डासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सील करेपर्यंत नाल्याला पूर आल्याने कर्मचारी रात्रभर अडकून पडले होते.

Web Title: Tractor delivered sealed polling machine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.