चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने मुलांना विषबाधा
By Admin | Updated: December 10, 2014 00:16 IST2014-12-10T00:16:08+5:302014-12-10T00:16:08+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना.
_ns.jpg)
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने मुलांना विषबाधा
बुलडाणा : अंगणात खेळत असलेल्या दोन लहान मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने त्यांना विषाबाधा झाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सव येथे घडली आहे. दोन्ही मुलांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सव येथील दिशा देवानंद सावळे (३) व राज पांडुरंग खरात (४) ही दोन्ही लहान मुले अंगणात खेळत होती. तर त्यांचे आई वडील हे मजूरी करण्यासाठी शेतात गले होते. अंगणात खेळत असतानाच या दोन्ही मुलांनी बाजुलाच असलेल्या चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्या. काही वेळाने त्यांना मळमळ व उलटया होण्यास सुरूवात झाली. ही घटना शेजारच्या लोकांना कळताच त्यांनी दोन्ही मुलांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या आई वडीलांनी रुग्णालयात धाव घेतली.