ट्रकला जीवंत विजेच्या तारेचा स्पर्श; एक ठार, चार जखमी
By Admin | Updated: July 26, 2016 01:53 IST2016-07-26T01:53:33+5:302016-07-26T01:53:33+5:30
मलकापूर तालुक्यातील घटना.

ट्रकला जीवंत विजेच्या तारेचा स्पर्श; एक ठार, चार जखमी
मलकापूर (जि. बुलडाणा) : गोदामात माल उतरविण्याकरिता ट्रक मागे घेत असताना, ट्रकच्या मागील बाजुकडील लोखंडी अँगलला जीवंत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात मो.जावेद मो. शफी (वय ३0) हा ठार झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वरील गुरूकृपा सर्व्हिसिंग सेंटर समोरील गोदामाजवळ घडली. या घटनेतील चार जखमींना उपचारार्थ बुलडाणा येथे हलविण्यात आले.