शौचालयाच्या टाक्यात पडून चिमुकला गतप्राण
By Admin | Updated: May 25, 2017 19:53 IST2017-05-25T19:53:31+5:302017-05-25T19:53:31+5:30
खामगाव : शौचालयाच्या पाण्याने भरलेल्या टाक्यात पडून २ वर्षीय चिमुकला गतप्राण झाला. ही घटना नांदुरा येथील मोतीपुरा भागात बुधवारी सकाळी घडली.

शौचालयाच्या टाक्यात पडून चिमुकला गतप्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शौचालयाच्या पाण्याने भरलेल्या टाक्यात पडून २ वर्षीय चिमुकला गतप्राण झाला. ही घटना नांदुरा येथील मोतीपुरा भागात बुधवारी सकाळी घडली. नांदुरा येथील मोतीपुरा भागात राहणारे संतोष रावणचवरे यांनी शौचालय बांधकामासाठी घरासमोर टाके बांधून सदर टाके पाण्याने भरुन ठेवले होते. दरम्यान बुधवारी संतोष रावणचवरे हे मजुरीसाठी बाहेर गेले होते. तर घरी असलेली त्यांची पत्नी घरकामात मग्न होती. यावेळी संतोष रावणचवरे यांचा २ वर्षीय चिमुकला अंकुश रावणचवरे हा झाकण नसलेल्या शौचालयाच्या पाण्याने भरलेल्या टाक्यात पडला. काहीवेळानंतर अंकुशची आई त्याचा शोध घेत असताना अंकुश पाण्याने भरलेल्या टाक्यात पडल्याचे दिसून आले. यानंतर अंकुश यास शहरातील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मृत झाल्याचे निष्पन्न झाले.