संतनगरीत आज ‘श्रीं’चा प्रकटदिन महोत्सव
By Admin | Updated: February 11, 2015 01:12 IST2015-02-11T01:12:30+5:302015-02-11T01:12:30+5:30
शेगाव नगरीत भजनी दिंड्यांसह लाखो भक्तांची मांदियाळी.

संतनगरीत आज ‘श्रीं’चा प्रकटदिन महोत्सव
शेगाव (बुलडाणा): संतनगरी शेगाव येथे ङ्म्री संत गजानन महाराजांचा १३७ वा प्रकटदिन सोहळा उद्या ११ फेब्रुवारी रोजी भक्तीमय वातावरणात होत आहे. या सोहळयासाठी संपुर्ण शेगाव नगरी सजली असुन राज्यभरातुन आज १0 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत एक हजारावर भजनी दिंड्या दाखल झाल्या आहेत.
संत गजानन महाराज संस्थानमध्ये सकाळी १0 ते १२ वाजेपर्यंत ह्णश्रीह्णच्या प्राकट्यानिमित्त हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचत्य कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. या उत्सवादरम्यान सुरू झालेल्या महारूद्र स्वाहाकार यज्ञाची पुर्णाहूती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज, अश्वासह नगर परिक्रमा निघणार आहे. गुरुवार, १२ फेब्रुवारीला हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होत आहे.