आजपासून कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:26 IST2017-08-01T00:22:38+5:302017-08-01T00:26:22+5:30

मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्यावतीने १ आॅगस्टपासून बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहेत.

From today's junior colleges close | आजपासून कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद!

आजपासून कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद!

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन१५ वर्षांपासून २२ हजार ५०० शिक्षक करताहेत विना वेतन ज्ञानदानाचे कार्य आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत करणार आंदोलनास

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्यावतीने १ आॅगस्टपासून बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहेत.
राज्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या जवळपास तीन हजारच्यावर आहे. सदर महाविद्यालयात सुमारे २२ हजार ५०० शिक्षक गेल्या १५ वर्षांपासून विना वेतन ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. सन २०१४ मध्ये सरकारने या महाविद्यालयाच्या शासन आदेशातील ‘कायम’ शब्द काढून आर्थिक अनुदानासाठीची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली.
आतापर्यंत सुमारे तीन वर्ष संपूणही मूल्यांकन पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित केली नाही. याबाबत कृती समितीने राज्यात जवळपास २०० च्यावर आंदोलने केली; मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे व वेळकाढूपणामुळे फक्त आश्वासनावरच बोळवण केली गेली.

Web Title: From today's junior colleges close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.