आज प्रकाशोत्सव

By Admin | Updated: October 23, 2014 00:14 IST2014-10-23T00:14:27+5:302014-10-23T00:14:27+5:30

बुलडाणा शहरात दिवाळीसाठी खरेदीची धूम, को-या नोटा, चांदीच्या नाण्यांना पसंती.

Today's Festival of Light | आज प्रकाशोत्सव

आज प्रकाशोत्सव

बुलडाणा : दिवाळी हा मांगल्याचा सण. या उत्सवात लक्ष्मी पूजनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये कोर्‍या नोटा, सोने व चांदींचे सिक्के, चलनातील नाणी ठेवण्याची पूवार्पार पध्दत आहे. त्यानुसार गुरूवार २३ ऑक्टोबर रोजी होणार्‍या लक्ष्मी पूजनासाठी अनेकांनी कोर्‍या नोटांची जुळवाजुळव आज चालविली होतीे. यासोबतच सोने-चांदींच्या लक्ष्मी, गणेशाचे छापील नाणे खरेदीसाठी सराफा बाजारात एकच झुंबड उडाली होतीे.
अश्‍विन अमावस्या सदोषकाळ म्हणजे लक्ष्मीपूजन होय. लक्ष्मी ही चंचल आहे, असा समज हिंदू शास्त्राप्रमाणे असून लक्ष्मी पूजनाने ती स्थिर होते, अशी आख्यायिका आहे. अनेक घरांमध्ये श्री सुक्ताचे पठणदेखील केले जाते. या दिवशी लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले, याची आठवण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते.
याच दिवशी व्यापार्‍यांचे नवे वर्ष सुरू होते. पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची लक्ष्मी पूजनाला वर्षानुवर्ष परंपरा चालत आली आहे. पहाटे पाटावर रांगोळी काढली जाते. तांदूळ किंवा तबक ठेवतात. पूजेमध्ये सोन्याचे दागिने, सोन्या-चादिंचे नाणे, कोर्‍या नोटा ठेवल्या जातात. तसेच घरातील स्वच्छतेसाठी केरसुणीची हळद कुंकू लावून पूजा केली जाते त्यामुळे केरसुणीचीही विक्री मोठया प्रमाणात सुरू आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे धर्माने अधर्मावर विजय मिळविण्याचा दिवस. हा दिवस मंगलमय दीपाने उजळावयाचा आहे, अशी आपली पारंपारीक ङ्म्रद्घा आहे. पूजेकरिता कोर्‍या नोटा मिळविण्यासाठी बँकेत एकच गर्दी झाली होती. चांदीची लक्ष्मी, मूर्ती, सिक्के, समई, गणेश मूर्ती आदिंची खरेदी जोरात सुरू असल्याची माहिती सराफा व्यवसायीकांनी दिली.

Web Title: Today's Festival of Light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.