सभापती, उपसभापतींची आज निवडणूक
By Admin | Updated: May 29, 2015 00:13 IST2015-05-29T00:13:03+5:302015-05-29T00:13:03+5:30
जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक.

सभापती, उपसभापतींची आज निवडणूक
जळगाव जामोद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक शुक्रवार २९ रोजी होत आहे. दुपारी ४ ते ५.३0 या वेळात या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक डी.यू. शेगोकार यांनी दिली. सभापतीपदासाठी शेतकरी विकास आघाडीचे संचालक तथा भारिप-बमसं नेते प्रसेनजित पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, उपसभापतीपदाच्या नावाची घोषणा ऐनवेळी करण्यात येणार आहे. या पदासाठी शेतकरी विकास आघाडीचे संचालक शहादेव सपकाळ, जुबेरोद्दीन पटेल व अशोक गवळी या तिघांपैकी एकाचे नाव निश्चित केल्या जाईल. याबाबतचा निर्णय काँग्रेसचे नेते रामविजय बुरूंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील व तालुकाध्यक्ष राजू पाटील हे घेतील. शेतकरी विकास आघाडीचे १८ पैकी १६ संचालक असल्याने ही सभापती व उपसभापतींची निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे. शेतकरी सहकार विकास पॅनलकडे दोनच संचालक आहेत, त्यामुळे ते सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी दाखल करणार नाहीत, असे वाटते. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, सभापतीपदासाठी प्रसेनजित पाटील यांचे नाव फार पूर्वी निश्चित करण्यात आले आहे. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडीने निवडणूक लढविली होती. भारिप-बमसं, काँग्रेस व मनसे या तीन राजकीय पक्षांची ही आघाडी होती. उपसभापतीपद हे काँग्रेसला देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चार संचालकांपैकी तीन संचालक हे या स्पर्धेत आहेत. या तिघांपैकी ऐनवेळी एकाचे नाव काँग्रेस पुढे करणार आहेत.