आज ठरतील गावचे कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:31 IST2021-01-18T04:31:28+5:302021-01-18T04:31:28+5:30

९ टेबलवर होणार मोजणी; टाऊन हॉल़,परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था सिंदखेडराजा : १५ जानेवारी रोजी मतदान झालेल्या ४० ग्रामपंचायतींची मतमोजणी ...

Today will be the village steward | आज ठरतील गावचे कारभारी

आज ठरतील गावचे कारभारी

९ टेबलवर होणार मोजणी; टाऊन हॉल़,परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था

सिंदखेडराजा : १५ जानेवारी रोजी मतदान झालेल्या ४० ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी येथील नगर परिषद टाऊन हॉलमध्ये होणार आहे.

मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ९ टेबलवर पाच राऊंडमध्ये ही मतमोजणी होणार आहे.यासाठी प्रशासन सज्ज असून पोलिसांनीही हा परिसर बंद केला आहे.

सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांनी दिली आहे.

उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक,प्रत्येक ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी यासाठी सज्ज आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही टाऊन हॉल परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.मात्र त्यातील ३ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्याने ४० ठिकाणी १३७ बूथवर १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले.३५७ सदस्य निवडण्यासाठी ७८ टक्के मतदान झाले.एकूण ६०३ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदान यंत्रात बंद केले.

Web Title: Today will be the village steward