सैनिक व कुटुंबीयांप्रती आज कृतज्ञता सोहळा
By Admin | Updated: August 9, 2014 00:04 IST2014-08-08T23:46:35+5:302014-08-09T00:04:52+5:30
क्रांतीदिन : चिखली येथे चेके पाटील फाऊंडेशनचा उपक्रम

सैनिक व कुटुंबीयांप्रती आज कृतज्ञता सोहळा
चिखली :
शहीदोंकी चिताओंपे लगेंगे
हर बरस मेले,
वतन पे मिटनेवालो का
यही बाकी निशाँ होंगा।।
भौतिकवादाच्या मागे सुसाट वेगाने धावत स्वार्थापलिकडे काही न पाहणार्या समाजाला देशाच्या सिमा व लाखो देश वासियांचे रक्षण करणार्या शूरवीर सैनिकांचे कळत नकळत विस्मरण होते. मात्न चेके पाटील फाऊंडेशनसारख्या संस्था समाजाचे जागृत रक्षक बनून सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या बलिदान व त्यागाचे स्मरण करवून देतात, हाच काय तो दिलासा आहे.
निस्वार्थ समाजसेवेचे व्रत घेऊन कार्यरत असलेल्या येथील चेके पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय चेके पाटील यांनी याच उद्देशाने ९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून ह्यशूरा मी वंदीलेह्ण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनेकांच्या बलिदानानंतर स्वतंत्न झालेल्या भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारी लष्कराचे जवान प्राणाची पर्वा न करता सांभाळतात. प्रतिकूल परिस्थितीत व मृत्यूच्या सावटाखाली सतत वावरणार्या या सैनिकांना हजारो किलोमिटर अंतरावरील आपल्या कुटुंबातून मिळणारे पाठबळ व हिंमत याचे देखील फार मोठे योगदान असते. ही बाब लक्षात घेऊन फाऊंडेशनने माजी सैनिक बहुउद्देशीय शिक्षण व क्र ीडा संस्था चिखली, भारतीय माजी सैनिक संघटना बुलडाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिकांप्रती कृतज्ञता व त्यांच्या कुटूंबियांना जाहीर वंदन करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सैनिक कल्याण विभागाचे संचालक नवृत्त कर्नल सुहास जतकर हे राहणार आहे. यावेळी भारतीय नौसेनेचे कॅप्टन वरूणसिंह शौर्यचक्र, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार बडगे, भारतीय नौसेना कारवारचे सब लेफ्टनंट दिग्वीजय अंभोरे यांच्याहस्ते शुरवीर सैनिकांच्या कुटुंबियांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून वीर सैनिक व त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे, आवाहन चेके पाटील फाऊंडेशन, माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटनेतर्फे करण्यात आले आहे.