शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

थकीत शेतकऱ्यांनी फिरविली नाफेडच्या तूर खरेदीकडे पाठ

By admin | Updated: April 4, 2017 00:46 IST

शेतमाल विक्रीतून संमतीविना ४० टक्के कर्जकपात

खामगाव : अवसायनात असलेल्या जिल्ह्यातील ग्रामसेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नवसंजीवनी मिळावी, तसेच कोट्यवधी रुपयांची थकलेली कर्ज वसुलीसाठी प्रशासनाने सक्तीने पाऊल उचलले असून, या अंतर्गत शेतमालापोटी देण्यात येणाऱ्या चुकाऱ्यातून ४० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या संमतीविना कपात केली जात आहे. शेतकऱ्यांना हक्काची असणारी जिल्हा केंद्रीय बँक तसेच ग्रामसेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकल्याने गत काही वर्षांपासून अवसायनात आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेला केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. मात्र, तरीही या बँकेचे व्यवहार अजूनही सुरळीत झाले नाहीत. परिणामी शेतमाल विक्रीतून मिळणाऱ्या रकमेमधून ४० टक्के कपात सक्तीने केली जात आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती/सचिव, जिल्ह्यातील सर्व तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थाचे अध्यक्ष/व्यवस्थापक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पत्र दिले असून, कर्जकपातीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. याबाबत दिलेल्या पत्रात, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम ४८ (अ) आणि कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम ३० (अ) अन्वये ग्रामसेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदाच्या शेतमाल विक्रीतून सांगड पद्धतीने सहकारी संस्थांची कपात करणे कायद्यातील तरतुदीनुसार अनिवार्य आहे. ही कायद्यातील अनिवार्य तरतूद असल्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या तूर या शेतमालाचे विक्रीतून कर्जदार शेतकऱ्याकडील कर्जाची कपात विक्री रकमेच्या ४० टक्के मर्यादेपर्यंत करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्याची संमती नसली, तरीसुद्धा विक्री रकमेच्या ४० टक्केपर्यंत किंवा कर्ज रक्कम यापैकी जे कमी असेल तितकी कपात करून सदर रक्कम संबंधितांकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच वरील कायद्यातील तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित अधिनियमानुसार आपण कार्यवाहीस पात्र राहाल, याची नोंद घ्यावी, असा इशारासुद्धा या पत्रान्वये देण्यात आला आहे. एकूणच या पत्रानुसार शेतमाल चुकाऱ्यातून कर्ज रक्कम कपात केली जात आहे.

कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी फिरविली नाफेडच्या केंद्रांकडे पाठनाफेड केंद्रावर तूर विकल्यानंतर सहकारी संस्थांच्या थकीत असलेल्या कर्जाची कपात केली जात आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ग्रामसेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडून नाफेड केंद्रावर तूर विक्रीऐवजी खुल्या बाजारात तूर विक्री केली जात आहे. नाफेडचे केंद्रावर शेतकऱ्यांचा शेतमाल स्वीकारल्या जात असला, तरी अनेकजण व्यापारी म्हणून शेतकऱ्यांजवळील तूर खरेदी करुन शेतकऱ्यांचे सातबारा जमा करुन शेतकऱ्यांच्या नावावर नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने शेतमाल विक्री करतात. मात्र, शेतमाल चुकाऱ्यातून थकीत कर्जाची कपात सुरु झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी आपली तूर व्यापाऱ्याला देऊन त्याच्याकडून रक्कम घेतली. तसेच चुकाऱ्यांच्या पैशातून कर्ज कपातही करून घेतल्याची काही उदाहरणे दिसून येत आहेत.