स्वयंपाकी, मदतनिसांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:22 AM2021-06-23T04:22:57+5:302021-06-23T04:22:57+5:30

‘एक गाव, एक वाण’ माेहीम यशस्वी करा बुलडाणा : ‘एक गाव, एक वाण’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कापूस पिकासाठी ९५ गावे ...

Tired of cooks, helpers | स्वयंपाकी, मदतनिसांचे मानधन थकले

स्वयंपाकी, मदतनिसांचे मानधन थकले

Next

‘एक गाव, एक वाण’ माेहीम यशस्वी करा

बुलडाणा : ‘एक गाव, एक वाण’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कापूस पिकासाठी ९५ गावे निवडण्यात आली आहेत. या गावांमध्ये कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच ही माेहीम यशस्वी करावी,असे आवाहन कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

ठिबक सिंचनचे अनुदान अदा करा

बुलडाणा : ठिबक सिंचन संच खरेदी करण्यासाठी पूर्वपरवानगी देण्यात आली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ठिबक सिंचन संच अनुदानाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ द्यावा, असे आदेश कृषी सचिवांनी दिले.

ऑनलाइन जुगारावर पाेलिसांची धाड

बुलडाणा : बुलडाणा-चिखली रोडवर असलेल्या वृंदावननगरातील एका घरात सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून संगणकासह तब्बल एक लाख २७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाेकराचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करा

बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवडलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे डेस्कनुसार प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, असे आदेश कृषी विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.

जबरदस्ती शेत पेरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा : मेरा खुर्द येथील एका महिलेचे शेत नातेवाईक असलेल्या दोघांनी जबरदस्तीने पेरल्यामुळे वाद निर्माण झाला. यामध्ये महिलेस शिवीगाळ व जीवे मारल्याची धमकी दिल्याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी मेरा खुर्द येथील भुजंग आनंदा काळे व विशाल भुजंग काळे या बापलेकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दाभाडी येथे हिवताप जनजागरण अभियान

माेताळा : तालुक्यातील दाभाडी येथे कोविड लसीकरण तसेच हिवताप जनजागरण सप्ताह १७ जून रोजी साजरा करण्यात आला. आरोग्यसेवक डोके यांनी माहिती दिली. कार्यक्रमास सरपंच लता तायडे, उपसरपंच अरविंद चोपडे, सुनील तायडे, शाळा समिती अध्यक्ष वासुदेव चोपडे हजर होते.

किनगाव राज ते निमगाव वायाळ रस्त्याची दुरवस्था

सिंदखेड राजा : तालुक्यातील किनगाव राजा ते रोहणा फाटादरम्यान किनगाव राजा ते निमगाव वायाळ रस्त्याची मागील सात ते आठ वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्त्याचे काम होणे तर दूरच; परंतु या रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आलेली नाही.

रस्त्याअभावी पिंपळगाव येथील ग्रामस्थ त्रस्त

सिंदखेड राजा : तालुक्यातील पिंपळगाव सोनार हे गाव कित्येक वर्षांपासून रस्त्यापासून वंचित आहे. तसेच प्रत्येक पावसाळ्यात या गावात पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना चालताना कमालीची कसरत करावी लागत आहे.

नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी

चिखली : तालुक्यात १६ जून राेजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मुसलमान, अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर मंडळामधील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.

पाझर तलाव फुटल्याने जमीन खरडली

बुलडाणा : अमडापूर येथील गट क्र. ३४ व ३५६ मधील कृषी विभागाचा पाझर तलाव होता. त्या तलावाला सपाट करण्याचा प्रयत्न झाल्याने तो फुटला असून, यामुळे मधुकर मोतीराम सोनुने यांची जमीन खरडून गेली.

अनेक गावात सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

चिखली : तालुक्यातील उंद्री, वैरागड, हरणी, टाकरखेड मु., अमडापूर, मुंगी, धानोरी, किन्ही सवडद, घानमोड व अमडापूर ही गावेवगळता तालुक्याला अद्यापही सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.

तीन गावांमध्ये पाणीटंचाई कायम

चिखली : पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतरही चिखली तालुक्यातील असोला, सैलानी नगर आणि कोलारा या तीन गावात पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Tired of cooks, helpers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.