टिप्परच्या धडकेत चिमुकली ठार
By Admin | Updated: December 13, 2014 00:21 IST2014-12-13T00:21:50+5:302014-12-13T00:21:50+5:30
मातोळा तालुक्यातील शेलापूर बसस्थानकाजवळील घटना.

टिप्परच्या धडकेत चिमुकली ठार
मोताळा(बुलडाणा) : भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेमध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी शेलापूर (नवीन) ता. मोताळा येथील बस स्टँडनजीक घडली. वडिलांसोबत सकाळी हेयर कटींग सलूनवर जात असताना हा अपघात घडला. काही विपरीत घडण्याअगोदरच बोराखेडी पोलिसांनी घटनास् थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, चालक रघुनाथ रमेश चिम रा. शेलापूर याला ताब्यात घेतले आहे. शेलापूर (नवीन) येथील सुदामा समाधान घनोकार रा. बेलोरा ता. नांदुरा ह. मु. शेलापूर हे १२ डिसेंबर रोजी सकाळी आपली चिमुकली मुलगी अंकीताला घेऊन कटींग करण्यासाठी सलूनवर जात होते. दरम्यान शेला पूर बस स्टँडनजीक मुलीसह डाव्या बाजूने जात असताना टिप्पर क्रमांक एम. एच. २८ अेबी ७९६४ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून मागून धडक दिल्याने चिमुकली अंकीता ही खाली कोसळली आणि टिप्परच्या पुढील चाकात आल्याने, तिच्या डोक्याला जबर मार लागला. यात ती जागीच ठार झाली. या अपघातप्रकरणी मुलीचे वडील सुदामा घनोकार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात चालक सुरेश रघुनाथ चिम विरूद्ध कलम २७९, ३0४ भादंविसह सहकलम १३४, १८४ मोटारवाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.